किम जोंग उनने पहिल्यांदाच मुलीला जगासमोर आणले; असायची अज्ञातवासात…कशाचे संकेत?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ नोव्हेंबर । उत्तर कोरियाचा (North Korea) हुकुमशाह किंम जोंग उन (Kim Jong-un) त्याच्या गोपनीय लाईफस्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतो. कधी किम जोंग उनच्या हेअरस्टाईलचे, कधी त्याच्या वाढत्या किंवा कमी झालेल्या वजनाचेही फोटो व्हायरल होतात. तर कधी या हुकुमशाहाने दिलेल्या निर्घृण शिक्षा चर्चेचा विषय बनतो. आता पुन्हा एकदा किम जोंग उन चर्चेत आला आहे. याचं कारण आहे, किम जोंग उनची मुलगी.

उत्तर कोरियाचा सर्वोच्च नेता किम जोंग उन हा नुकताच आपल्या लहान मुलीचा हात हातात घेऊन चालताना दिसला. खरे तर किम जोंग उन हा नेहमीच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल कमालीची गुप्तता पाळतो. त्याच्या गुप्ततेसाठीही तो ओळखला जातो. परंतु, प्रथमच तो आपल्या मुलीला घेऊन जगासमोर आल्याने जगभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रसारमाध्यमांनी किमसोबत दिसणाऱ्या त्या मुलीचे नाव दिले नाही. मात्र किमची मुलगी गेल्या अनेक वर्षांपासून अज्ञातवासात पाहत होती. शुक्रवारी तिने किमसोबत क्षेपणास्त्राच्या चाचणीचे निरीक्षण केले. किम आपल्या नेहमीच्या पेहरावात दिसतोय. तर, त्याची मुलगी पांढऱ्या रंगाचे जॅकेट परिधान करुन किमचा हात हातात धरुन त्याच्यासोबत निघाली आहे. ते दोघे एका लष्करी तळावर असल्याचे दिसते. बाबांचा हात हातात धरुन ही चिमुकली लष्करी उपकरणांकडे पाहात आहे.

दरम्यान, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन गेल्या महिन्यात कोरोनापेक्षाही जास्त चर्चेत होता. या हुकूमशहाचा मृत्यू झाल्याच्या चर्चा जगभरात रंगल्या होत्या. एवढेच नाही तर त्याचा उत्तराधिकारी कोण असेल हे देखील जगाने ठरवून टाकले होते. तसेच त्याच्या मृत्यूची कधी आणि कशी घोषणा होणार हे देखिल वाऱ्यासारखे पसरले होते. मात्र, किमचा ठणठणीत असल्याचा व्हिडीओ आला आणि सारे शांत झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *