पिंपरी चिंचवड मनापाने व्यवसाय सूरु करण्याच्या परवानगीच्या नावा खाली सरू केलेली करवसुली थांबवावी आणि शहरातील व्यवसाय सुरु करण्याबाबत धोरण तातडीने निश्चित करावे…..” आमदार अण्णा बनसोडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे -: गेली ४५ दिवसांपासून टाळेबंदी मुळे शहरातील अनेक व्यवसाय बंद असल्याने व्यावसायिकांची व नागरिकांची गैरसोय होत आहे. मनपा प्रशासनाच्या वतीने शहरातील व्यावसायिकांनी परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर परवानगी देणे सुरु केले असून ही परवानगी मिळण्यासाठी मनपा मालमत्ता कर भरणा केल्याची पावती जोडणे अनिवार्य केले आहे, सध्या ‘कोविड – 19’ या महामारीच्या कठीण परिस्थितीत परवानगीच्या नावाखाली कर वसुली करणे अन्यायकारक असून अनेक दिवसांपासून व्यवसाय बंद असल्याने शहरातील लहान-लहान दुकानदारांची आर्थिकदृष्ट्या मोठी अडचण निर्माण झालेली आहे.

म्हणून, पुणे मनपाच्या धोरणा प्रमाणे, विविध प्रकारच्या दुकानदारांची सूची तयार करून आठवड्यातील वारानुसार शहरातील सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्याबाबत धोरण जाहीर करावे, अशी सूचना आमदार बनसोडे यांनी मनपा आयुक्तांना केली आहे. असे धोरण निश्चित झाल्यास कोणत्याही व्यावसायिकास मनपाकडे अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही व मनपा प्रशासनावर या परवानगी प्रकरणी निर्माण होत असलेल्या अतिरिक्त कामाचा ताण पुर्णतः कमी होईल. परिणामी प्रशासनास शहरातील कोरोना नियंत्रित करण्याच्यादृष्टीने योग्य त्या खबरदारीचे उपाय योजण्यावर लक्ष केंद्रित ठेवणे सोयीचे ठरणार आहे.

मनपाने कोरोनाच्या सारख्या माहामारीच्या संकट समयी स्थानिक करदात्याकडे थकबाकीदार म्हणून न पाहता पालकाच्या भूमिकेतून त्यांना संपूर्ण सहकार्य करणे अपेक्षित आहे. शहरातील जो दुकानदार / व्यावसायिक मनपाचा करभरणा मागील अनेक वर्षानुवर्षे करीत आहे. तो घटक आज संकटात आहे. या महामारीच्या काळात अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय भांडवला अभावी बंद पडणार आहेत. त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून मनपाने उत्पनाकडे लक्ष केंद्रित न करता व्यावसायिकांना आधार द्यावा म्हणून मनपाने सर्व समावेशक धोरण तातडीने निश्चित करावे, असा उल्लेख आमदार बनसोडे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *