बुलढाणा स्त्री रुग्णालयाचे होणार आधुनिकरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – बुलढाणा – विशेष प्रतिनिधी – गणेश भड -: आरोग्य मंत्री मा ना राजेशजी टोपे, यांच्या सहकार्याने टाटा ट्रस्ट च्या आर्थिक मदती मधून तसेच टाटा ट्रस्ट चे वैद्यकीय सल्लागार डॉ.संतोषजी भोसले यांच्या सहकार्याने स्त्री रुग्णालय बुलढाणा येथे सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असून नवे रूप आणण्याच्या प्रयत्नात गेली कित्येक दिवस आपण होतो. या बाबतचा सतत पाठपुरावा आपण केला व खा.शरद पवार साहेब व आरोग्य मंत्री राजेशजी टोपे, व टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने हे काम पूर्ण होणार आहे.

या बाबत आज जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे टाटा ट्रस्ट चे श्री.आशिष लोणारे (AGM टाटा ट्रस्ट) यांच्या सोबत बैठक पार पडली, याबाबत ची पाहणी देखील करण्यात आली आजपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे, स्त्री रुग्णालय हे अत्यंत अद्यावत होणार असून यासाठीच्या स्थापत्य कामांसाठी ३ कोटी रुपयांचा खर्च करण्याची तयारी टाटा ट्रस्ट ने दाखवली आहे. या व्यतिरिक्त सर्व अवश्यक वैद्यकीय उपकरणे पुरवण्याची माहिती त्यांनी दिली, यावेळी जिल्हाधिकारी सुमन रावत चंद्रा , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पंडित, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.भुजबळ उपस्थित होते..

*स्त्री रुग्णालय बुलडाणा येथे उपलब्ध होणार असलेल्या सुविधा….*

◆डॉक्टर,नर्स, सफाई कर्मचारी, व इतर ९७ चा स्टाफ उपलब्ध असणार.
◆१०० नवीन बेडची सुविधा होणार उपलब्ध.
◆६ ICU
◆कार्डियाक बेड्स
◆मॉनिटर्स ची सुविधा
◆ व्हेंटिलेटर
◆ISOLATION वॉर्ड, GENERAL वॉर्ड सह
◆१० OPD रम
◆ किचन रूम

व इतर वैद्यकीय सुविधेने परिपूर्ण असलेल्या सुविधांचे रुग्णालय येत्या सहा हप्त्यांमध्ये पूर्ण होणार आहे. या सुविधांचा जास्तीत जास्त फायदा हा सर्वसामान्य, मध्यंवर्गीय लोकांना होणार असून आता शासकीय वैद्यकीय उपचार घेण्यासाठी औरंगाबाद, पुणे जाण्याची गरज बुलडाणाच्या जनतेला भासणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *