पिंपरी चिंचवड मधील व्यापाऱ्यांना औद्योगिक कंपन्या,उद्योग धंदे व दुकाने चालू करण्यास विना अटी परवानगी देण्यात यावी . प्रदीप रामचंद गायकवाड अध्यक्ष (पिंपरी चिंचवड व्यापारी संघटना)

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे -: सध्याच्या बिकट परिस्थितीत सरकारला महसूल मिळावा, यासाठी शहरातील विक्रेते आणि व्यावसायिकांना परवानगी देण्यासाठी अर्ज भरुन घेतले जात आहेत.गेल्या 45 दिवसांपासून व्यवसाय पूर्णपणे ठप्प असल्याने व्यापारी आणि व्यावसायिक वर्ग आर्थिक दृष्ट्या त्रस्त झालेला आहे. पालिका काही ठराविक दुकाने उघडण्यास परवानगी देणार हे कळाल्यावर अनेक व्यावसायिकांनी समाधान व्यक्त् केले . परंतु दुकान उघडण्यासाठी परवानगी देणाऱ्या अर्जासोबत जोडावयची कागदपत्रे पाहताच व्यवसायिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


नियमावलीप्रमाणे पालिकेने आपल्या संकेतस्थळावर परवानगीसाठीचा अर्ज अपलोड केला आहे. हा अर्ज संबंधित क्षेत्रीय कार्यालयात जमा करायचा आहे. या अर्जासोबत तीन कागदपत्रे जोडण्यास सांगण्यात आली आहेत. त्यात शॉप ऍक्टय, उद्योग आधाराची झेरॉक्स आणि दुकानाचा मार्च-2020 अखेरपर्यंतचा कर भरला असल्याच्या पावतीची झेरॉक्सक जोडण्यास सांगितले आहे. परंतु पुणे महानगर पालिकेने ने जाहीर केलेल्या पत्रकानुसार संदर्भ जावक नं . मआ/साप्रवि/६२० प्रमाणे पुणे महानगर पालिका क्षेत्रात विना अटी तेथील व्यापाऱ्यांना नियमावली नुसार दुकाने व उद्योग चालू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगिक क्षेत्रात पिंपरी-चिंचवड महापालिकेने विना अटी परवानगी द्यावी.


तरी आपण वरील बाबींची गंभीरता लक्ष्यात घेता योग्य तो निर्णय घेऊन पिंपरी चिंचवड मधील व्यापाऱ्यांना औद्योगिक कंपन्या,उद्योग धंदे व दुकाने चालू करण्यास विना अटी परवानगी देण्यात यावी हि नम्र विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *