PAN-Aadhaar Card : पॅन-आधार कार्डबाबत मोठी अपडेट; जाणून घ्या,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २२ नोव्हेंबर । ज्यांच्याकडे पॅन आणि आधार कार्ड (Pan-Aadhaar Card) आहे, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडे सुद्धा पॅन आणि आधार कार्ड असेल तर सरकारकडून मोठी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, आजकाल आपल्या प्रत्येक आर्थिक व्‍यवहार करण्‍यासाठी या दोन्ही कार्डांची आवश्‍यकता आहे, त्‍यामुळे तुम्‍हाला यासंबंधित प्रत्येक अपडेटची माहिती असणे गरजेचे असते. आता सरकारने यासंबधी नवीन अपडेट माहिती दिली आहे, यासंदर्भात जाणून घेऊया….

सरकारने म्हटले आहे की, सर्व कार्डधारकांनी आपले आधार कार्ड पॅन कार्डशी त्वरित लिंक करावे. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे पॅनकार्ड अवैध होईल आणि जर तुम्ही अवैध कार्ड वापरले तर तुम्हाला 10,000 रुपये दंड भरावा लागेल.

प्राप्तिकर विभागाने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, प्राप्तिकर कायदा, 1961 नुसार, पॅन कार्डला आधार कार्ड लिंकर करण्याची शेवटची तारीख 31.3.2023 आहे, ही त्या सर्व धारकांसाठी आहे, जे सवलत श्रेणीत येत नाहीत. जर पॅन आधारशी लिंक नसेल तर पॅन निष्क्रिय होईल. उशीर करू नका, आजच लिंक करा.

अधिकृत वेबसाइट
आधार आणि पॅन ही दोन्ही कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी www.incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला Link Aadhaar चा ऑप्शन दिसेल. तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. आता येथे लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जावे लागेल.

अशाप्रकारे होईल लिंक
आता प्रोफाइल सेटिंगमध्ये तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचा ऑप्शन दिसेल, तो सिलेक्ट लागेल. तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड येथे दिलेल्या सेक्शनमध्ये भरावा लागेल. त्यानंतर माहिती भरल्यानंतर खाली दाखवलेल्या ‘Link Aadhaar’ या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुमचा आधार लिंक होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *