IND vs BAN : दुखापतींचं ग्रहण ; बांगलादेश दौऱ्यापूर्वी भारताच्या अष्टपैलू खेळाडूची माघार; Suryakumar Yadav पदार्पण करणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २३ नोव्हेंबर । भारतीय संघामागे लागलेलं दुखापतींचं ग्रहण काही सुटता सुटेना… ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा या दोन स्टार खेळाडूंपाठोपाठ दीपक चहर दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे यांना वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची ( WTC) तयारी सुरू केली आहे आणि फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला बांगलादेश व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धचे सर्व कसोटी सामने जिंकावे लागणार आहेत. आता भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहेत आणि त्यापूर्वीच त्यांना धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही आणि तो बांगलादेश दौऱ्यातून माघार घेण्याची शक्यता बळावली आहे.

ऑगस्ट महिन्यात जडेजा भारताकडून अखेरचा खेळला होता. बांगलादेश दौऱ्यासाठी त्याचे संघात निवड केली गेली होती, परंतु ३३ वर्षीय अष्टपैलू खेळाडू अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही. तो आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होणार आहे आणि पुढील वर्षीच तो पुनरागमन करणार आहे. त्याच्याजागी BCCI सूर्यकुमार यादव आणि शाहबाज अहमद यांच्या नावाच विचार करत आहे. ”जडेजा तपासासाठी आणि पुनर्वसनासाठी NCA मध्ये अनेकदा आला आहे. आताचं सांगायचं झाल्यात तो बांगलादेश दौऱ्यावर जाण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही,”असे बीसीसीआयच्या सूत्रांनी PTI ला सांगितले.

आशिया चषक स्पर्धेत हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यानंतर जडेजा मैदानापासून दूर आहे. त्याच महिन्यात त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. त्यामुळेच त्याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर तीन वन डे व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. जडेजाचा या मालिकेसाठी संघात समावेश केला गेला होता. सूर्यकुमार यादवचा फॉर्म पाहता त्याला कसोटीत संधी देण्याचा विचार सुरू आहे.

 

भारताचा वन डे संघ – रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल

भारताचा कसोटी संघ – रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *