महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २३ नोव्हेंबर । आपल्याला खळखळून हसवणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता सागर कारंडेच्या तब्येतीबाबत गेली दोन दिवस अनेक अफवा समोर येत होत्या. कुणी म्हणत होतं त्याला रुग्णालयात दाखल केले आहे तर कुणी म्हणत होतं त्याला हृदय विकाराचा झटका आला आहे. तर काहींनी तो सीरियस असल्याचेही म्हंटले होते. यावर अखेर अभिनेता सागर कारंडे यानेच खुलासा केला आहे. नेमका काय झालं होतं, याबाबत त्याने स्पष्टता दिली.
बऱ्याचदा आपण आपल्या कामात इतके व्यक्त असतो की त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. तब्येतीकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचं फटका आपल्याला बसतो. विशेषकरून दिवसरात्र चित्रीकरण करणाऱ्या कलाकारांना याचे भीषण अनुभव येत असतात. याच अनुभवातून आता सागर कारंडे गेला आहे. सागरच्या तब्येती दोन दिवसांपूर्वी बिघाड झाला होता. यासंदर्भात त्याने आता खुलासा केला आहे.
सागरच्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाचा 20 नोव्हेंबर रोजी गिरगावातील साहित्य संघात प्रयोग होता या नाटकाच्या प्रयोगाआधी सागरच्या छातीत दुखू लागलं. त्याच्या ही गोष्ट वेळेत लक्षात आल्यानं त्याला त्वरित डॉक्टरांकडे नेण्यात आलं. पण सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीबाबत चुकीची माहिती पसरवण्यात आल्यानं त्यानं खुलासा करण्यासाठी फेसबुक लाइव्ह करत सागरनं माहिती दिली आहे.