Raj Thackeray : राज ठाकरे येत्या 29 नोव्हेंबरपासून 9 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २४ नोव्हेंबर । मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 29 नोव्हेंबरपासून 9 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरात अंबाबाईच दर्शन घेऊन राज ठाकरे दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत कोकणवासीयांची संख्या अधिक असल्याने दौरा उपयुक्त ठरणार आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दौऱ्यात पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. तसेच दौऱ्यात ते आगामी निवडणुका आणि पक्ष बांधणीचा आढावा घेणार आहेत. (Latest Marathi News)

राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याची घोषणा झाल्यापासून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा व चैतन्यचे वातावरण निर्माण झाले आहे. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे कुणाकुणाच्या भेटी घेतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *