IND vs NZ 1st ODI Live : भारतीय संघात दोन युवा खेळाडूंचे पदार्पण, नव्या पर्वाची सुरूवात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २५ नोव्हेंबर । ट्वेंटी-२० मालिकेनंतर भारत-न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतात २०२३मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपच्या तयारीलाही याच मालिकेतून सुरुवात होणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आदी अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे, परंतु युवा खेळाडूंना संधी देऊन मजबूत फळी निर्माण करण्याचा संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. जागतिक क्रमवारीत नंबर १ असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा पटकावण्यासाठी चुरस आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

आजच्या सामन्यात अर्शदीप सिंग किंवा उम्रान मलिक यांच्यापैकी कोणाला संधी दिली जाते याची उत्सुकता होती, परंतु आज दोघंही पदार्पण करत आहेत. शिखऱ धवन व शुबमन गिल ही जोडी सलामीला येणार आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर, रिषभ पंत, सूर्याकुमार यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल व उम्रान मलिक अशी टीम आहे.

– टीम साऊदी वन डे क्रिकेटमध्ये २०० विकेट्स घेण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि त्याला १ बळी टिपायचा आहे. तो न्यूझीलंडकडून २०० विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज ठरले.
– २०१९च्या वर्ल्ड कप फायनलनंतर केन विलियम्सन केवळ सहा वन डे सामना खेळला आहे, परंतु त्याचा स्ट्राईक रेट ५६.१६ राहिला आहे.
– वन डे क्रिकेटमध्ये यंदाच्या वर्षात भारताकडून सर्वाधिक २१ विकेट्स ( ११ सामने) युजवेंद्र चहलच्या नावावर आहेत.

न्यूझीलंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फिन अॅलन, डेव्हिन कॉनवे, केन विलियम्सन, टॉम लॅथम, डॅरील मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, टीम साऊदी आणि ल्युकी फर्ग्युसन असे खेळाडू आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *