ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा अनोखा विक्रम, पोर्तुगालची घाना वर मात

 41 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ नोव्हेंबर । शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या पोतुर्गालने घानाचा 3-2 असा पराभव करीत वर्ल्ड कपच्या ‘एच’ गटात विजयी सलामी दिली. रोनाल्डोने 65 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करीत आपल्या पाचही वर्ल्ड कपमध्ये गोल करण्याचा अनोखा पाम प्रस्थापित केला. तो असा पराक्रम करणारा पहिला आणि एकमेव खेळाडू आहे.

अत्यंत वेगवान संघर्षपूर्ण सामन्यात पहिल्या हाफमध्ये एकाही संघाला आपले गोलांचे खाते उघडता आले नाही. मात्र दुसऱया हाफमध्ये 65 व्या मिनिटाला ख्रिस्तीयानो रोनाल्डोला घानाच्या खेळाडूच्या चूकीमुळे पेनल्टी मिळाली आणि त्याने या पेनल्टीला गोलमध्ये परिवर्तित केले. मात्र त्यानंतर पोर्तुगालची आघाडी फार काळ राहिली नाही. 73 व्या मिनिटाला कर्णधार आंद्रे आयूने अप्रतिम गोल करीत घानाला बरोबरीवर आणले. मग जोआओ फेलिक्सने गोल करून पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली आणि 80 व्या मिनिटाला राफाएल लिओने गोल ठोकून त्यांची आघाडी 3-1 ने वाढवली, मात्र 89 व्या मिनिटाला ओस्मान बुकारीने अफलातून गोल केला आणि सामन्याची चुरस वाढवली. 10 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत घानाचा जोरदार खेळ पाहायला मिळाला, पण त्यांना बरोबरी साधता आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.