FIFA – Argentina Vs Mexico : अर्जेंटिनाचा आज मेक्सिकोशी सामना ; लिओनेल मेस्सीला दर्जा दाखवावा लागणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ नोव्हेंबर । नव्या पिढीचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची प्रतिष्ठा पणास लागली आहे. मेस्सीच्या अर्जेंटिनावर विश्वकरंडकातील आव्हान कायम राखण्याचे संकट आहे. सौदी अरेबिया संघाकडून सलामीच्या लढतीत पराभूत झाल्यामुळे अर्जेंटिना संघाला उद्याच्या लढतीत पराभवापासून दूर रहावे लागणार आहे. मेक्सिकोकडून अर्जेंटिनाचा पराभव झाल्यास त्यांचे या स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात येईल. या वेळी मेस्सीच्या विश्वकरंडक जिंकण्याच्या स्वप्नांना सुरुंग लागेल. ‘क’ गटातील महत्त्वाची लढत आज होणार आहे.

ला लीगा करंडक १० वेळा, चॅम्पियन्स लीग ४ वेळा आणि कोपा अमेरिका एक वेळा जिंकणाऱ्या संघाचा सदस्य असलेल्या मेस्सी याने सात वेळा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कारही पटकावला आहे. फुटबॉल विश्वातील स्वप्नवत जीवन त्याने जगले आहे. मात्र एका करंडकाने त्याला सातत्याने हुलकावणी दिली आहे. विश्वकरंडक त्याच्यापासून दूरच राहिला आहे.

कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या मेस्सीचा कतारमधील विश्वकरंडक हा अखेरचा असेल. ही स्पर्धा जिंकून स्वप्नतृप्तीने फुटबॉलला अलविदा करण्याचा ध्यास त्याने बाळगला असेल. सौदी बाद फेरीत ? सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का देत महत्त्वाचे तीन गुण मिळवले. आता त्यांना अंतिम १६ फेरीमध्ये धडक मारण्याची सुवर्णसंधी आहे. पोलंडविरुद्धच्या लढतीत विजय मिळाल्यास ते आगेकूच करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *