विक्रम गोखलेंची तब्येत पुन्हा खालावली, डॉक्टरांनी दिले Update

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ नोव्हेंबर । गेल्या काही दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात भरती असलेल्या विक्रम गोखले यांच्या आरोग्याशी निगडीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याचं रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी यांनी माहिती दिली. काल रुग्णालयाकडून दिलेल्या माहितीनुसार गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच त्यांनी डोळे उघडले आणि हात- पाय हलवल्याचंही बोललं जात होतं. तसेच ४८ तासांमध्ये त्यांना व्हेंटिलेटरवरून हटवण्यात येईल. मात्र आता त्यांची तब्येत खालावल्याने व्हेंटिलेटर हटवणार नसल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *