औरंगाबाद शहरात गोवरची धास्ती वाढली; रुग्णांचा मोठा आकडा समोर…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ नोव्हेंबर । लहान बालकांमध्ये आता जिल्ह्यात गोवरचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. यापूर्वी तीन बालकांना गोवरची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र, रविवारी अजून दोन बालक गोवर पॉझिटिव्हच आले आहेत. यामुळे आता चिंता अजूनच वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात आता पर्यंत ४१ बालके संशयित आढळून आली आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे.

मुंबईनंतर आता औरंगाबादेतदेखील गोवरचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे. रविवारी शहरातील नहदी कॉलोनी भागात राहणारे दोन बालकांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. ज्यात एका बालकाचे वय ७ वर्षे आहे तर दुसऱ्याचे बालकाचे वय ३ वर्षे आहे. दोन्ही शहरातील नेहरूनगर आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या नाहिद कॉलनीतील रहिवाशी आहेत. दोन्ही बालकांवर आरोग्य विभागाकडून उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. दोघांची प्रकृती ठीक आहे.

चालू महिन्याचा विचार केला असता आतापर्यंत या महिन्यात एकूण पाच रूग्ण पॉझिटिव्हच आढळून आले आहेत तर तब्बल ४१ रूग्ण संशयित आहेत. सर्वसंशयित रुग्णाचे नमुने हाफकीन प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात सत्तत्याने संशयित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेकडूनदेखील खबरदारीचा उपाय म्हणून विविध भागात मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करण्यात येत आहे.

या बरोबरच सर्वत्र लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. ज्या भगात संशयित रूग्ण आढळून येत आहे. त्या भगात आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *