देशाला गरज आहे औद्योगिक नेतृत्व करण्यासाठी धडपडणारे , प्रयत्न करणारे तरुण वर्ग ; पी.के. महाजन… कर सल्लागार…पिंपरी चिंचवड- पुणे.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे : आपल्याकडे राजकीय नेतृत्व करण्यासाठी, नेता होण्यासाठी धडपडणारे कार्यकर्ते-जिवाची बाजी लावणारा तरुण वर्ग गल्लो गल्ली पासुन ते दिल्ली पर्यंत पहायला मिळतो परंतू आद्योगिक नेतृत्व करण्यासाठी धडपडणारे , प्रयत्न करणारे लोकसंख्याच्या मानाने खुपच कमी आहेत. देशाचा विकास होण्यासाठी आद्योगीक – व्यापार क्षेत्राचा विकासात वाढ होणे गरजेचे आहे म्हणूनच उद्योगातील अनेक क्षेत्रात त्या त्या क्षेत्रातील तरुण वर्ग औद्योगीक नेतृत्त्व करण्यास उदयास आला पाहीजे.

आता आपण औद्योगीक नेतृत्व म्हणजे काय हे समजून घेवू या.. एखादा उद्योग धंदा सुरु करण्या पासुन ते तो उद्योग धंदा यशस्वी होई पर्यंत जे काही कार्य करावे लागते, काबाडकष्ट करावे लागतात त्यालाच ” औद्योगीक नेतृत्व म्हणतात. किंवा ” उद्योजक ” म्हणतात. ज्या प्रमाणे जनतेची सेवा करणारा व देशाला योग्य ती दिशा देणारा म्हणजे..”नेता” त्या प्रमाणे जनतेला नोकरी – पूरक उद्योग देणारा व देशाचा आर्थीक विकास करणारा म्हणजे ” उद्योजक ” – ” उद्योगपती ” होय.

कोरोना मुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे ती मजबूत करण्यासाठी देशातिल भांडवल दार नागरिकांनी शीक्षण कमी असो की जास्त असो पण ज्याची कष्ट करण्याची तयारी आहे. उद्योग म्हटला की आर्थीक चढ उतार येतात तेव्हा तो त्रास करण्याचा संयम आहे ,आर्थीक धोके सहन करुन पुढे जाण्याची जिद्द आहे, चिकाटी आहे, ध्येय गाठन्याची उमेद आहे अशा वर्गाने पुढे आले पाहिजे कारण की अशा लढवैय्या उद्योजकांची देशाला गरज आहे. . ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *