महाराष्ट्र २४- ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे : .. देशभरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही आरोग्य विभागापुढे अनेक आव्हानं उभी करत असतानाच एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गोव्यामागोमाग आता कोरोना विषाणूच्या कहरातून पूर्णपणे बाहेर येत आणखी एका राज्याने या संकटावर मात केली आहे. या राज्यातील एकमात्र कोरोना बाधितानेही या विषाणूचा पराभव केला आहे. हे राज्य म्हणजे मिझोरम.
शनिवारीच येथील कोरोना रुग्णाला सर्व उपचार आणि चाचण्यांनंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. ज्या आधारे आता पूर्वोत्तर भागातील ग्रीन झोन असणाऱ्या चार राज्यांमध्ये मिझोरमचाही समावेश झाला आहे. आतापर्यंत या यादीत नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, आणि सिक्कीम या राज्यांचा समावेश होता. आता फक्त आसाम आणि त्रिपूरा येथेच कोरोना रुग्ण आढळले असल्याची बाब समोर येत आहे.