Vijay Hazare Trophy 2022: ऋतुराज गायकवाडचा जलवा कायम; उपांत्य फेरीत झळकावले सलग दुसरे शतक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० नोव्हेंबर । विजय हजारे करंडक २०२२ स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना महाराष्ट्र विरुद्ध आसाम संघात खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार ऋतुराज गायकवाड आपली धावांची भूख कायम ठेवली आहे. त्याने या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातही चमकदार कामगिरी केली आहे. गायकवाडने आसामविरुद्ध शतक झळकावले आहे. ऋतुराज गायकवाडने १२६ चेंडूत १६८ धावा केल्या. त्यामुळे महाराष्ट्र संघाने आसाम समोर ३५१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

याआधी त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध एका षटकात चेंडूत ७ षटकार मारून इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला. त्यानंतर त्याने आपल्या संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले.आजच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या जोरावर ७ बाद ३५० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आसाम संघासमोर ३५१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *