महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ डिसेंबर । Gold Rate Today : आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमती वाढल्या की त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही होतो. फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी व्याजदराबाबत जारी केलेल्या विधानामुळे इक्विटी मार्केटमध्ये मौल्यवान धातूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात (Gold-Silver Rate)
आज 400 रुपयांची उसळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना सोनं खरेही करणं आज महागात पडू शकतं. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 53,340 रूपयांवर आला आहे. तर, चांदीच्या दरात 1200 रूपयांची वाढ होऊन आज एक किलो चांदीचा दर 64,620 रुपये आहे.
फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी केलेल्या विधानानुसार, फेडरल रिझर्व्हने महागाईशी लढण्यासाठी आरबीआयप्रमाणेच अनेक वेळा व्याजदर वाढवले आहेत. यामुळे अमेरिकन बाजारावर दबाव वाढला आहे. हे पाहता, डिसेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत फेडरल रिझर्व्ह दरवाढ संथ ठेवू शकते, असे संकेत यूएस फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी दिले आहेत.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
शहर सोने 1 किलो चांदीचा दर
मुंबई 48,895 64,620
पुणे 48,886 64,640
नाशिक 48,886 64,640
नागपूर 48,886 64,640
दिल्ली 48,794 64,520
कोलकाता 48,822 64,550