नाशिकमध्ये आजपासून पुन्हा हेल्मेटसक्ती, नियमांचा भंग केल्यास कारवाई

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ डिसेंबर । आजपासून पुन्हा नाशिक (Nashik) शहरात दुचाकी चालकांना हेल्मेट बंधनकारक असणार आहे. गाडी चालवताना हेल्मेट न घातल्यास मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई होणार आहे. तसेच पाचशे रुपयांचा दंडही आकारला जाऊ शकतो. त्यामुळं आता नाशिककरांना दुचाकीवर घराबाहेर पडताना सोबत हेल्मेट बाळगणं आवश्यक आहे.

नाशिकमधील हेल्मेट सक्तीची मोहीम तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या बदलीनंतर थंडावली होती. मात्र, आता पुन्हा मोहिमेला सुरुवात झाली असून आजपासून शहरात हेल्मेट न वापरणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून दुचाकी चालकांना एका आठवड्याची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपल्यावर आजपासून कारवाईला सुरुवात होणार आहे. कारवाईला सामोरे जायचे नसल्यास चांगल्या प्रतीचे हेल्मेट दुचाकी धारकांना वापरणे बंधनकारक आहे. आजपासून काही दिवस थंडावलेल्या हेल्मेटसक्ती मोहिमेला नाशिककरांना पुन्हा सामोरे जावे लागणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *