पुढची मुख्यमंत्री महिलाच असेल; उद्धव ठाकरेंच्या विधानाने पुन्हा चर्चांना उधाण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० नोव्हेंबर। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ही चर्चा अनेकदा आजही रंगताना दिसते. कोण होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री याची वाट अजूनही संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. यातच आता शिवसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्यानंतर पुन्हा या चर्चांना उधाण आले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे –

लहुजी वस्तादांच्या जयंती कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका वक्तव्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा त्याच चर्चेला उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला एक कर्तृत्ववान मुख्यमंत्री खुर्चीवर बसवायचा आहे. मग तो पुरुष असो किंवा स्त्री, असे त्यांनी म्हटले. यानंतर राज्यात जर महिला मुख्यमंत्री झाल्या तर कोण? यावर चर्चा सुरू झाली आहे. महिला मुख्यमंत्रीपदाच्या काही प्रबळ उमेदवार कोण असतील ते जाणून घेऊयात.

महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री कोण असतील, अशी चर्चा सुरू झाल्यावर सर्वात पहिले नाव समोर येते ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे. यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याही नावाची चर्चा होते. पण यानंतर तिसरा चेहरा हा कोण असेल, याबाबत इतकी चर्चा होताना दिसत नाही. यानंतर आता जसे उद्धव ठाकरे हे अचानक मुख्यमंत्री झाले, तसेच त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या सुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असू शकतात.

त्यामुळे महिला मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न आल्यावर महाविकास आघाडीतील कोणत्या महिलेला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार, यासंबंधीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *