महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३ डिसेंबर। मदुराई येथील सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालयात डॉक्टरांनी नुकतेच एका सहा वर्षाच्या गायीच्या पोटातून 65 किलो प्लास्टिक आणि धातूचा कचरा काढला आहे. त्यामुळे पशुवैद्यकांनी पालिका अधिकाऱ्यांना रस्त्यावरील भटक्या प्राण्यांना कचरा खाण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आहे.
स्थानिक व्यक्ती परमेश्वरन यांनी नुकतेच गेल्या महिन्यात आपल्या गायीला रुग्णालयात आणले होते. त्यांची गाय अनेक दिवसांपासून पाणी पीत नव्हती तसेच काही खात देखील नव्हती. दरम्यान तिने नुकताच एका बछड्याला जन्म दिला होता. चाचणी केल्यानंतर डॉक्टरांना कळाले की या गायीचे पोट प्लास्टिक आणि धातूच्या कचऱ्याने भरले आहे. त्यामुळे गायीला भूक देखील लागत नव्हती. अखेर मुख्य पशुवैद्य डॉ. वैरासामी व इतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून गायीच्या पोटातून प्लास्टिक काढले.