महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ डिसेंबर। घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरात बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात येत आहे. यानिमित्त विविध संघटनांकडून पोस्टर्सही लावण्यात आले आहेत. अशाच एका पोस्टरमुळं मात्र वाद निर्माण झाला आहे. तामिळनाडूत एका भित्तीपत्रकात लावण्यात आलेल्या पोस्टरवर डॉ. आंबेडकरांच्या फोटोमुळं हा वाद निर्माण झाला आहे.
Tamil Nadu | A poster showing BR Ambedkar in saffron clothes purportedly put by Indu Makkal Katchi on Ambedkar's death anniversary in Kumbakonam
"Ambedkar is a national leader," says Indu Makkal Katchi founder Arjun Sampath. pic.twitter.com/meqLtlrhsF
— ANI (@ANI) December 6, 2022
भगव्या कपड्यातील आणि कपाळी विभूतीच्या तीन रेषा लावलेला फोटो वापरण्यात आला आहे. यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. हिंदू मुन्ननी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर चिकटवलं आहे. यामध्ये आंबेडकरांना हिंदुत्ववादी नेते म्हणून दाखवण्यात आलं आहे. या प्रकाराचा विदुथराई चिरुथैगल काची नामक पक्षानं या घटनेचा निषेध केला आहे. या पोस्टरमध्ये बाबासाहेबांच्या या फोटोसह तमिळ भाषेत काही वाक्ये लिहिण्यात आली आहेत.