तंत्रज्ञानाच्या मदतीमुळेच जगाला करोनापासून मुक्ती मिळवण्यात मदत मिळत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – करोनासारख्या संकटाचा सामना करण्यासाठीही तंत्रज्ञानाची मोठी मदत होत असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिना’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत १९९८ मध्ये पोखरण येथे करण्यात आलेल्या अण्विक चाचणीचीही आठवण काढली. “१९९८ मध्ये आजच्याच दिवशी आपल्या वैज्ञानिकांनी एक मोठी कामगिरी केली होती आणि तो भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण होता. दुसऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी जे तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहेत त्या सर्वांना आम्ही सलाम करतो,” असंही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सर्वांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. तंत्रज्ञानाच्या मदतीमुळेच जगाला करोनापासून मुक्ती मिळवण्यात मदत मिळत असल्याचं ते म्हणाले. “१९९८ मध्ये पोखरणमध्ये करण्यात आलेल्या अण्विक चाचणीवरून मजबूत राजकीय नेतृत्व हे किती आवश्यक आहे हे येतं,” असं मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करताना म्हटलं.

“आज करोनापासून जगाला मुक्त करण्याच्या प्रयत्नात निरनिराळ्या तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. करोना व्हायरसचा पराभव करण्याचा मार्ग शोधून काढणाचे प्रयत्न करणाऱ्या सर्व संस्था आणि योद्ध्यांना मी नमन करतो. मला आशा आहे की आपण निरोगी राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत राहू,” असंही त्यांनी नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *