महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये मजूर अडकले आहेत. दरम्यान महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना इच्छित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. एका दिवसात एसटीच्या माध्यमातून ८ हजार मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सोडण्यात आले.
रस्ता आणि रेल्वे रुळांच्यामार्गे मजूर पायपीट करत चालले आहेत. औरंगाबादच्या रेल्वे रुळ दुर्घटनेनंतर याचे गांभीर्य प्रखरतेने समोर आले. राज्य शासनाने यासाठी महत्वाची पाऊले उचलत मजुरांना मोफत एसटी प्रवास देण्याची घोषणा केली. रस्त्याने पायपीट करत चाललेल्या सुमारे ८ हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचविण्यात आले.