डिसेंबर मध्ये भारतीय बाजारात दाखल होणार हे स्मार्टफोन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ डिसेंबर । तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असलात तर थोडी प्रतीक्षा करा. डिसेंबरच्या, वर्षाच्या शेवटच्या महिन्यात भारतीय बाजारात अनेक दिग्गज कंपन्या त्यांचे स्मार्टफोन सादर करत आहेत. त्यात प्रामुख्याने चीनी कंपन्याचे फोन आहेत तसेच कोरियन सॅमसंग कंपनीचे फोन सुद्धा आहेत.

रिअलमी १० प्रो सिरीज चीन मध्ये अगोदरच लाँच झाली आहे. रिअलमी १० प्रो आणि १० प्रो प्लस हे दोन फाईव्ह जी स्मार्टफोन ८ डिसेंबर रोजी भारतात सादर करत आहे. १२ जीबी रॅम, २५६ जीबी इंटरनल स्टोरेज आणि १०८ एमपीचा प्रायमरी कॅमेरा अशी त्याची खासियत आहे. १० प्रो प्लस कॅर्व्ड डिस्प्ले सह आहे. रेडमी नोट १२ चीन मध्ये लाँच झाला असून तो भारतात लवकरच येणार आहे. १२ प्रो आणि १२ प्रो प्लस हे दोन्ही फाईव्ह जी फोन आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एम ०४ हे वर्ष संपण्याच्या अगोदर भारतीय बाजारात आणणार आहे मात्र त्यांनी लाँच तारीख अजून जाहीर केलेली नाही. या फोन साठी ६.५ एचडी प्लस डिस्प्ले दिला जात आहे.

चीनी कंपनी टेक्नो पोवा ४ हा नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणत आहे. हा फोन अमेझोनवर लिस्ट केला गेला असून त्याला ८ जीबी रॅम, आणि ६००० एमएएच बॅटरी असेल असे समजते. विवो हि चीनी कंपनी त्यांचा वाय ओ टू स्मार्टफोन ५.१ इंची डिस्प्ले सह आणेल. त्याची तारीख अजून जाहीर झालेली नाही. आयक्यू सिरीज ८ डिसेम्बर रोजी लाँच केली जात असून त्यात ११ व ११ प्रो हे नेक्स्ट जनरेशन स्नॅपड्रॅगन झेन २ चिपसेट सह येतील. या फोन साठी ६.७८ इंची स्क्रीन दिला जाईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *