Swiggy Layoff : स्विगीकडूनही कर्मचाऱ्यांना नारळ, 250 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ डिसेंबर । अलिकडे अनेक दिग्गज टेक कंपन्यांकडून (Tech Companies) नोकरकपात (Layoff) झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता फूड डिलिव्हरी ॲप (Food Delivery App) स्विगी (Swiggy) कंपनीही कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डिसेंबर महिन्यामध्ये स्विगी कंपनी नोकरकपात करण्याची शक्यता आहे. स्विगी 3 ते 5 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत आहे. इकोनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या नोकरकपातीमध्ये स्विगीच्या देशभरातील कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे.

स्विगीही कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता
मीडिया रिपोर्टनुसार, स्विगीकडून ग्राहक सेवा विभाग (Customer Care Department), तंत्रज्ञान आणि उत्पादन विभागातून नोकरकपात होण्याची शक्यता आहे. स्विगीने नोव्हेबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मोठं किचनही बंद केलं आहे. स्विगी निवडक लोकांमध्ये अधिक चोखपणे काम करण्याची योजना आखत आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर कर्मचाऱ्यांना रेटींग्स, बोनस किंवा कामावरून टाकण्याच्या निर्णय घेण्यात येईल, असं एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

शेकडो कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात
येत्या काळात स्विगी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना हटवण्यात येऊ शकतं. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी सध्या 250 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता आहे. पण हा आकडा वाढू शकतो. अलीकडच्या काळात अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना हटवलं जात आहे. या कंपन्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *