महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ डिसेंबर । लग्नसराईचे दिवस आहेत. याच दिवसांमध्ये सोन्याला खूप मोठी मागणी असते. सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. MCX वर सोने 54000 च्या जवळपास पोहोचलं आहे. तर एमसीएक्सवर चांदीचा भाव ६६१०० च्या पुढे गेला आहे.
सोन्याने कॉमेक्सवर 1780 डॉलरचा टप्पा पार केला आहे, तर चांदी 22.50 डॉलरच्या वर राहिली आहे. जर तुम्ही कॉमेक्सवर सोन्याची चलती पाहिली तर 1 आठवड्यात 1 टक्के आणि 1 महिन्यात 4 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्याचबरोबर 1 वर्षात त्यात 46 टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीमध्ये 1 आठवड्यात 1 टक्के आणि 1 महिन्यात 7 टक्के वाढ झाली आहे. 1 वर्षात त्यात 3 टक्के वाढ झाली आहे.
एमसीएक्सवर सोन्याची वाटचाल पाहिली तर 1 आठवड्यात 1 टक्के आणि 1 महिन्यात 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर 1 वर्षात त्यात 12 टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर 1 आठवड्यात 2 टक्के आणि 1 महिन्यात 6 टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर 1 वर्षात त्यात 8 टक्के वाढ झाली आहे.
गोल्ड रिटर्नने दिलेल्या माहितीनुसार कसे आहेत सोन्याचे दर
24 कॅरेट 1 ग्रॅम -5,400
24 कॅरेट 8 ग्रॅम – 43,200
24 कॅरेट 10 ग्रॅम – 54,000
22 कॅरेट 1 ग्रॅम – 4,950
22 कॅरेट 8 ग्रॅम – 39,600
22 कॅरेट 8 ग्रॅम – 49,500