ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी : शिंदे सरकारचा आणखी एक झटका

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ डिसेंबर । ईडी, सीबीआय तपासणीच्या याचिकेवर मात्र हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला भाजपच्या मदतीने शिवसेनेत मोठी फूट पाडून उद्धव ठाकरेंचे सरकार खालसा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पूर्वाश्रमीच्या पक्षप्रमुखांना आणखी एक मोठा झटका दिला. उद्धव व ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. सरकारी वकील अर्जुन कामत पै यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली. मुंबईतील प्रिंटिंग व्यावसायिक गौरी भिडे यांनी उद्धव व ठाकरे कुटुंबीयांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत त्याची ईडी किंवा सीबीआयमार्फत चौकशीची मागणी जनहित याचिकेद्वारे केली आहे. गुरुवारी न्यायमूर्ती धीरज ठाकूर व न्यायमूर्ती वाल्मीक मेनेझिस यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मात्र याचिकेच्या सुनावणीबाबत हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे.

ठाकरेंचा दावा : आरोप गृहितकांवर आधारित, विशिष्ट हेतूने याचिकाकर्त्यांचे आक्षेप { एखाद्या पक्षाचा प्रमुख किंवा मंत्री होणे हे उत्पन्नाचे साधन होऊ शकत नाही. मग ठाकरेंनी मुंबई व रायगडमध्ये इतकी संपत्ती जमवली कशी, हे तपासावे. {उद्धव, आदित्य आणि रश्मी यांनी कधीही व्यवसाय, उत्पन्नाचे स्रोत उघड केले नाहीत, मग त्यांच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून? {प्रबोधन प्रकाशन आणि उद्धव यांच्या उत्पन्नाचे नेमके स्रोत काय? कोरोनाकाळात सर्व माध्यमे तोट्यात असताना ‘सामना’चा टर्नओव्हर ४२ कोटी, त्यात नफा ११ कोटी होता. काळा पैसा पांढरा करण्याचा हा खटाटोप.

ठाकरेंच्या वकिलांचा प्रतिवाद {ठाकरेंचे वकील अस्पी चिनॉय व अशोक मुंद्रगी म्हणाले, हे आरोप गृहितकांनुसार, विशिष्ट हेतूने आहेत. {याचिकाकर्त्यांनी आधी पोलिसांत तक्रार द्यायला हवी होती, मग कायदेशीर पर्यायांचा वापर करायला हवा होता. या प्रक्रियेचे उल्लंघन करून थेट हायकोर्टात तक्रार करण्यात आली. {ठाकरे हे सध्या सत्तेत नाहीत. त्यामुळे ते राज्यातील तपास यंत्रणांवर प्रभाव टाकतील असे म्हणता येणार नाही. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांमार्फत तपासाची मागणी योग्य नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी.

{विधान परिषद निवडणूक शपथपत्रात उद्धव यांनी आपल्याकडे 143.26 कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे, त्यांच्या पत्नी रश्मी या 65.09 कोटींच्या मालकीण आहेत. { आदित्य ठाकरेंकडे 16.05 कोटींची संपत्ती, बीएमडब्ल्यू कार आहे.

यापूर्वी मुख्य न्यायमूर्तींनी दिला होता नकार २२ नोव्हेंबर रोजी ही याचिका आपल्यासमोर सुनावणीला घेण्यास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांनी नकार दिला होता.

निकटवर्तीयांवर छापे यापूर्वी रश्मी ठाकरेंचेे बंधू श्रीधर पाटणकर यांचे ११ फ्लॅट ईडीने जप्त केले होते, तर खा. संजय राऊत यांना पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *