पंतप्रधान मोदी नागपुरात : शिंदे, फडणवीस गडकरींकडून स्वागत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ डिसेंबर । समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावर दाखल झाले आहेत.

विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले.

वंदे भारत एक्सप्रेला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नागपूर विमानतळावर आहेत. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरम एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. नागपूर ते बिलासपूर ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना सर्व अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. देशात अशा रेल्वेंची संख्या आणखी वाढवण्याची केंद्र सरकारची योजना आहे.

‘मेट्रो टप्पा 1’चे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात फ्रिडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून प्रवास करणार आहेत. तिथे पंतप्रधान ‘नागपूर मेट्रो टप्पा 1’चे लोकार्पण करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान ते ‘नागपूर मेट्रो टप्पा-२’ ची पायाभरणीही करणार आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदी नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत आणि महामार्गाचा दौरा करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते ‘एम्स नागपूर’ रुग्णालयाचे लोकार्पण करणार आहे.

विविध प्रकल्पांची पायाभरणी

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात आज एका जाहीर कार्यक्रमात 1500 कोटींहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील. यावेळी मोदी जनतेला संबोधित करतील. याशिवाय पंतप्रधान मोदी राष्ट्रीय वन हेल्थ संस्था (एनआयओ ), नागपूर आणि नागपुरातील नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणीही करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी चंद्रपूर येथील केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (सीआयपीईटी) संस्थेचं उद्घाटन करणार आहेत. त्याचबरोबर ‘हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्र, चंद्रपूर’चे लोकार्पण करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *