महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ डिसेंबर । लक्ष्मण रोकडे । पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवरी पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बंदोबस्तावरील एका पोलीस निरीक्षकास, 2 पोलीस उपनिरीक्षकांना आणि 7 पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
शाईफेक करणाऱ्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे –
1. पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर (गुन्हे शाखा, युनिट 2)
2. पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग समाधान सिसोदे (गुन्हे शाखा)
3. गणेश दत्तू माने (चिंचवड पो.स्टेशन)
4. ASI भाऊसाहेब मुरलीधर सरोदे (चिंचवड पो.स्टेशन)
5. ASI दीपक महादेव खरात (गुन्हे शाखा)
6. पो. हवालदार प्रमोद सूर्यकांत वेताळ (गुन्हे शाखा)
7. पो.नाईक देवा शिवाजी राऊत (गुन्हे शाखा)
8. पो. नाईक सागर दशरथ अवसरे (गुन्हे शाखा)
9. महिला पो. कांचन प्रशांत घवले (चिंचवड पो.स्टेशन)
10. महिला पो. प्रियांका भैय्यालाल गुजर (मुख्यालय).