महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ डिसेंबर । येरवड्यात पीएमपीएल बस खाली चिरडून एक जण जागीच ठार येरवड्यात पीएमपी बसच्या चाकाखाली आल्याने एक इसम चिरडला गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री साडेसात वाजण्याची सुमारास घडली. ही घटना सादल बाबा चौकाजवळ रेड्डी हॉटेल समोर हा अपघात झाला.
पीएमपीएल बस क्रमांक (एम एच -14 एचयु -5044) मार्ग क्रमांक 148 ही बस भोसरी येरवड्याकडून चंद्रमा चौकाच्या दिशेने जात असताना अचानक बसच्या मागील चाकाखाली एक इसम आला. बसचे चाक अंगावरून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
अरुंद रस्ता, बेशिस्त वाहनचालक तसेच या गर्दीच्या मुख्य चौकात हॉटेल, वाईन शॉप व परिसरात करण्यात येणारी बेशिस्त वाहनांची पार्किंग यामुळे या ठिकाणी अनेकदा लहान मोठे अपघात होतात. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
मात्र पीएमपीएल चासक ही बेशिस्तीने वाहन चालवत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिक करत आहेत. गर्दीच्या ठिकाणी देखील काही चालक बसची गती कमी करत नाही, असा आरोपही करण्यात येत आहे.