महाराष्ट्र्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – राज्यात कोरोनाच्या 1230 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या 23,401 वर गेली आहे. आणखी 587 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत बऱ्या झालेल्या एकूण 4786 रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे.
राज्यात आणखी 36 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मुंबईत 20, सोलापूर शहरात 5, पुण्यात 3, ठाणे शहरात 2 आणि अमरावती जिल्हा, औरंगाबाद शहर, नांदेड शहर, रत्नागिरी व वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचे निधन झाले. उत्तर प्रदेशातील एका रुग्णाचा मुंबईत मृत्यू झाला. मृतांमध्ये 23 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी 17 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील, 16 रुग्ण 40 ते 59 वयोगटातील आणि 3 रुग्ण 40 वर्षांखालील होते. या 36 मृतांपैकी 27 जणांना (75 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते. कोविड-19 संसर्गामुळे राज्यातील बळींची संख्या आता 868 झाली आहे.