महाराष्ट्र्र २४ – ऑनलाईन – संभाजीनगर – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. औरंगाबादमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. काल रात्रीपर्यंत औरंगाबादमध्ये ६२७ रुग्णसंख्या झाली होती. त्यात २४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या आता ६५१ वर गेली आहे.