रोहित पवार अचानक बेळगाव दाखल, मुख्यमंत्री बोम्मईंना उत्तर; म्हणाले, आमच्या अस्मितेला…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ डिसेंबर । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज (मंगळवार) अचानक बेळगाव मध्ये जात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे. तसेच सीमा लढ्यातील जेष्ठ नेतृत्व, महाराष्ट्र एकीकरण समितीचे मध्यवर्ती अध्यक्ष दिपक दळवी यांची देखील भेट घेतली आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी खळबळजनक वक्तव्य केलं होतं.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर आणि काही गावांवर आपला दावा सांगितला होता. त्यानंतर राज्यभर या सीमावदाचे पडसाद दिसून आले होते. तर बोमम्या यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात न येणाच्या इशारा दिला होता. यामुळे दोन्ही मंत्र्यांनी ही दौरा स्थगित केला. मात्र आमदार रोहित पवार यांनी कर्नाटक सरकारला न जुमानता आज थेट बेळगाव मध्ये दाखल झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद मोठ्या प्रमाणात चिघळला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमम्या यांनी जत आणि अक्कलकोट तालुक्यावर केलेल्या दाव्यामुळे हा संघर्ष वाढला अशातच बेळगाव येथे कन्नड रक्षक वेदिके कडून महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला. यामुळे हा तणाव आणखी वाढत गेला. तसेच दोन्ही सीमा समन्वयमंत्र्यांनी देखील बेळगाव दौरा स्थगित केला.

यामुळे सरकारने वाद थांबवाव अन्यथा मला बेळगाव मध्ये जाव लागेल, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिला होता. असे असले तरी आज शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी थेट बेळगाव मध्ये जात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी चळवळीचे केंद्रस्थान असलेल्या येळ्ळूर गावास भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. रोहित पवार यांनी यावेळी बेळगावातील मराठी बांधवांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *