Sanjay Raut : लवकरच सरकार बदलणार, सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल ; संजय राऊतांचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ डिसेंबर । कोणतही सरकार कायम असत नाही. 2024 सरकार बदलणार आहे. त्यावेळी सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल अशा इशारा शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) दिला आहे. आयएनएस विक्रांत (INS Vikrant) घोटाळा प्रकरणी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्यांना(Kirit Somaiya) आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिनचिट (INS Vikrant Scam Case) मिळाली आहे. यावर बोलताना राऊतांनी इशारा दिली. तसेच याप्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहणार असल्याचे राऊत म्हणाले. ते आज सकाळी नाशिकमध्ये (Nashik) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सरकार बदलल्यानंतर ज्या गोष्टी घडतात त्यातील एक गोष्ट म्हणजे सोमय्यांना मिळालेली क्लिनचिट असल्याचे राऊत म्हणाले. आयएनएस विक्रांतच्या संदर्भात पैसे गोळा झाले आहेत. पैशांचा अपहार झालाच असल्याचे राऊत म्हणाले. पैसे राजभवनमध्ये गेले म्हणतात. राजभवन सांगते पैसे आलेच नाही. मग हाच भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा पुरावा असल्याचे राऊत म्हणाले. क्लिनचिट कशी मिळते हे राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारले पाहिजे. आमच्या लोकांना मात्र, क्लिनचिट मिळत नसल्याचे राऊत म्हणाले. हा ईडीच्या अखत्यारीतला विषय आहे. राष्ट्रीय संरक्षणाशी संबंधित विषय असल्याचे राऊत म्हणाले.

लोकशाहीत मार्गानं करण्यात येणाऱ्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नसल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. मोर्चाला परवानगी द्यावीच लागेल. कारण या देशात अजूनही लोकशाही आहे. हुकूमशाही नाही असेही राऊत म्हणाले. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या दैवतांचा अपमान करतात. सरकार त्याचं समर्थन करते. मग याविरोधात आम्ही मोर्चा काढायचा नाही का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.

भाजपचे नेते आणि राज्यपाल यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांचा अपमान होत आहे. तसेच कर्नाटक सीमा वादाचा सुरू असलेला प्रश्न यावरुन महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं 17 डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. लोकशाहीत मार्गानं करण्यात येणाऱ्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नसल्याचे राऊत म्हणाले. जर आम्ही मोर्चा काढावा असे तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही राज्यपालांना हटवायला पाहिजे होते. तुम्हा भाजपच्या प्रवक्त्यांवर कारवाई करायला हवी होती. कारवाई केली नाही मग आम्ही आता मोर्चा काढणार असल्याचं राऊतांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *