INS विक्रांत घोटाळा प्रकरणात सोमय्या पितापुत्रांना क्लिन चिट, मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितलं…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ डिसेंबर । भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विक्रांत बचाव घोटाळ्याचा आरोप केला होता. पण, पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचा दावा करत मुंबई पोलिसांनी नील सोमय्यांना क्लीन चीट दिली आहे.

आयएनएस विक्रांत युद्धनौका बचावासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाने लोकांकडून निधी जमा केला होता. या प्रकरणी आज पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचा दावा करत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सी समरी अहवाल कोर्टात सादर केला आहे.

आयएनएस विक्रांत बाचव मोहिमेतून मुंबईत ठिकठिकाणी लोकांकडनं मदतनिधी उभारण्याचा घाट घालत सुमारे 57 कोटींचा निधी जमा केल्याचा सोमय्यांवर आरोप झाला होता. मात्र या निधीचा सोमय्या पिता-पुत्रांनी अपहार केल्याचा आरोप करून माजी सैनिक बबन भोसले यांनी 7 एप्रिल 2022 रोजी तक्रार नोंदवली होती. त्यानुसार ट्रॉम्बे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 429, 406 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी सोमय्या पिता-पुत्रांना मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *