केन विल्यमसनने सोडले कसोटी संघाचे कर्णधारपद, हा खेळाडू झाला न्यूझीलंडचा नवा कर्णधार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ डिसेंबर । केन विल्यमसनने न्यूझीलंड संघाच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. न्यूझीलंड क्रिकेटने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे. मात्र, विल्यमसन वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व करणार आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

विल्यमसन म्हणाला की, ‘कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार बनणे हा माझ्यासाठी एक विशेष सन्मान आहे. माझ्यासाठी कसोटी क्रिकेट महत्वाचे आहे. या फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करताना मी आव्हानांचा आनंद घेतला आहे. कर्णधारपदामुळे मैदानावर आणि मैदानाबाहेर कामाचा ताण येतो. माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटते. पुढील दोन वर्षांत दोन विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सांभाळणे मला अधिक सोयीचे होईल.

विल्यमसनने कर्णधारपद सोडल्यानंतर अनुभवी खेळाडू टीम साऊदीची कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर टॉम लॅथमकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आली आहे. या महिन्यात पाकिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेद्वारे सौदी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. सौदीने 346 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि 22 वेळा टी-20 संघाचे नेतृत्व केले आहे. सौदी हा न्यूझीलंडचा 31 वा कसोटी कर्णधार असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *