सीमावाद पेटवणारा मास्टरमाइंड शोधा : अजित पवारांची मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ डिसेंबर । सीमाभागामध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी दोन्ही राज्यांनी दिल्लीत ठरवल्याप्रमाणे वागले पाहिजे. सीमावादाच्या आंदोलनामागचा मास्टरमाइंड शोधावा, अशी मागणी गुरुवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी वारंवार वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम केल्याचा घणाघातही त्यांनी केला. ते मुंबईत बोलत होते.

कसा उद्रेक झाला?

अजित पवार म्हणाले की, सीमावाद पेटवणारा सूत्रधार कोण आहे, हे का घडले, असा विरोध का आणि आंदोलन का झाले? यात जाणीपूर्वक कोणी ट्विटवर बातम्या सोडल्या आणि त्यातून लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. या भावनांचा उद्रेक झाला. उद्रेक होऊन या सगळ्या गोष्टी घडल्या, हे सारे समोर आले पाहिजे. आता काही जणांना असे वाटते की, हे कोणीतरी विरोधकांनी केले. अशी संशयाची सुई घेतली जाते. मात्र, यात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्याकडून चुकीचे नाही…

आम्ही कधीही राज्याच्या आणि देशाच्या एकसंधतेला धक्का लागणार नाही, कुठलिही चुकीची गोष्ट आम्हा लोकांकडून कदापिही घडणार नाही. हा सातत्याने दृष्टिकोन आम्ही वेगवेगळे राजकीय पक्ष ठेवत असतो, तरी पण कुठली शंका-कुशंका केंद्र सरकारला वाटत असेल, दोन राज्यातल्या प्रमुखांना वाटत असेल, तर त्यातले दूध का दूध आणि पानी का पानी पुढे आले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

त्यामुळे सारे घडले

अजित पवार पुढे म्हणाले की, कशामुळे हे निर्माण झाले. सगळे सुरळित सुरू होते. यामागचा मास्टरमाइंड कोण आहे? बोम्मई साहेबांनी तशा प्रकारचे स्टेटमेंट केले नसते, तर बरे झाले असते. आपण राज्याची निर्मिती झाल्यापासून निपाणी, बेळगाव कारवार मागतोय. त्यांनी त्यासंबंधी वक्तव्य केले. नंतर जत संबंधी वक्तव्य केले. त्यातून बोम्मई महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम करतायत. अशी भावना महाराष्ट्र वासियांच्या आणि सीमावासीयांच्या मनामध्ये निर्माण झाली. त्यामुळे हे सारे घडले.

साळवेंची नियुक्ती करा

कर्नाटक सीमावादासंदर्भात अनेकदा समित्या नेमल्या गेल्या. अनेकदा आंदोलने झाली. अनेकदा चर्चा झाल्या. मला आठवतेय पाठीमागच्या काळात वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या. मात्र,आता राज्य सरकारने आक्रमक होत खमकेपणाने भूमिका मांडावी. महाराष्ट्राच्या बाजून वकील म्हणून हरीश साळवे यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *