महाराष्ट्र्र २४ – ऑनलाईन – बुलढाणा -विशेष प्रतिनिधी – गणेश भड – जळगाव जामोद शहर वासीयांना विनंती करण्यात येते की आपल्या शहरात कोरोना च एक रुग्ण आढळून आला आहे. तो रुग्ण राहत असलेल्या परिसरापासून दुर्गा चौक-सिनेमा रोड-विजय चौक- भाजी मार्केट-बालाजी गल्ली-काजीपुरा-चावडी-बुलढाणा अर्बन- अग्रसेन बँक हा परिसर कन्टोन्मेंट झोन असून इतर भाग हा बफर झोन आहे.
कॅन्टोमेंट झोन मधील नागरिकांना बाहेर पडता येणार नाही तर बाहेरील नागरिकांना कॅन्टोमेंट झोन मधे जाता येणार नाही. त्या भागीतल नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याबाबत लवकरच व्यवस्था करण्यात येईल. या झोन मधील सर्व दुकाने, बँका बंद राहतील. त्याशिवाय बफर झोन मधील जीवनाव्यशक वस्तूंची दुकाने नेहमीप्रमाणे सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत सुरू राहतील. तसेच बफर झोन मधील नागरिकांनी सुद्धा अत्यंत आवश्यक काम असेल तरच घरा बाहेर पडावे, बाहेर जाताना चेहऱ्यावर मास्क, हातामध्ये ग्लोव्हज, सोशल डिस्टन्स, आणि सॅनिटाईझर आदी बाबींचा वापर करावा.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन समन्वयाने आपल्या साठी काम करत आहे आपण घरात थांबून सहकार्य करावे आणि अत्यावश्यक काम असल्यास च घराबाहेर पडावे ही विनंती. आपल्या सुरक्षे साठी मी सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात असून आवश्यक त्या उपाय योजना करीत आहे. खबरदारी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रेमचंद पंडित आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रेमसिंग राजपूत यांनी सुद्धा जळगाव जमोद ला भेट दिली आहे. खबरदारी म्हणून आपण त्या व्यक्ती च्या कुटुंबियाना आणि संपर्कातील काही व्यक्ती अश्या एकूण 22 लोकांना खामगाव येथील रुग्णालयात क्वारंटीन केले आहे. आपण शहरवासीय, प्रशासन, लोकप्रतिनिधी हे सगळे समनव्यातुन काम करत या संकटावर लवकरच मात करू. तरी शहरातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती
घरी राहा… सुरक्षीत राहा… धन्यवाद.…