![]()
सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची स्मार्ट सिटी व्यवस्थापक मनोज सेठिया यांना निवेदनाद्वारे मागणी
पिंपरी । निगडी बस स्टॉप या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक पुणे मुंबई तसेच शहरातील इतर ठिकाणी बस प्रवास करण्यासाठी येत असतात. निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूलाखालील पार्किंगमध्ये स्मार्ट सिटी अंतगत शौचालय उभारण्यात यावे. जेणेकरून नागरिकांना शौचालय सुविधा उपलब्ध होईल. मधुकर पवळे उड्डाणपूल खाली पार्किंगमध्ये निगडी बस स्टॉपसमोर स्मार्ट सिटी अंतर्गत शौचालय उभारण्यात यावे. अत्याधुनिक तंत्रज्ञान शौचालय शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत २६ ठिकाणी उभारण्यात येत असून निगडी गावठाण येथील मधुकर पवळे उड्डाणपूलाखाली पार्किंगमध्ये शौचालय उभारण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक मनोज सेठिया यांनी ईमेलद्वारे देण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने शहरात पीपीपी (सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर स्मार्ट टॉयलेट बांधण्यात येत आहेत. विमानतळावर असणारी अत्याधुनिक सुविधा नागरिकांना 5 रुपयांमध्ये उपलब्ध होईल, असा दावा केला जात आहे. याच धर्तीवर निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखालील पार्किंमध्ये स्मार्ट स्वच्छतागृह उभारावे. बस स्टॉपमुळे या ठिकाणी शहरातील इतर ठिकाणांपेक्षा जास्तच वर्दळ असते.
-सचिन काळभोर, सामाजिक कार्यकर्ते
