IPL Auction 2023: आज आयपीएल 2023 चा लिलाव, कोण होणार मालामाल?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २३ डिसेंबर । पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामासाठी आज (23 डिसेंबर) मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) कोचीमधील (Kochi) फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे क्रिडाप्रेमी लिलाव कार्यक्रमाची (TATA Indian Premier League Mini Auction) आतुरतेनं वाट पाहत असल्याचं दिसतंय. या लिलावात एकूण 405 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. ज्यामध्ये 273 भारतीय आणि 132 परदेशी आहेत आणि 10 फ्रँचायझींसह एकूण 87 जागा रिक्त आहेत.

तसेच 405 खेळाडूंपैकी 273 भारतीय आहेत तर 132 परदेशी खेळाडू देखील आहेत. यातील अनेक खेळाडूंना भरघोस रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. आयपीएलमध्ये (IPL 2023) अनेक खेळाडूंनी आपले चांगले करिअर घडवले आहे. यावेळी लिलावात सनरायझर्स हैदराबादकडे सर्वाधिक 42.25 कोटी रुपये आहेत. या लिलावात अफगाणिस्तानचा अल्लाह मोहम्मद गझनफर हा सर्वात तरूण खेळाडू असणार आहे. त्यामुळे संघ समिती तरुण खेळाडूंना संधी देणार की नाही?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तसेच आयपीएल मिनी लिलावामुळे संघांना त्यांच्या संघात काही नवीन चेहरे जोडण्याची संधी मिळते. टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघातील अनेक स्टार खेळाडूंवर बाजी मारण्याची शक्यता आहे. यामध्ये हॅरी ब्रूकसारख्या युवा स्टार्सचा समावेश आहे. लिलावादरम्यान संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

लिलाव कुठे होणार?
IPL 2023 चा लिलाव कोची येथे होणार असून आज दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. त्यासाठी सर्व संघांनी आपली रणनीती तयार केली आहे.

405 खेळाडूंवर बोली लागणार
आयपीएल 2023 लिलावात 405 खेळाडूंवर बोली लागणार आहे. आयपीएल 2023 साठी लिलाव कोची, केरळ येथे होणार आहे. जिथे सर्व 10 फ्रँचायझींचे मालक आणि अधिकारी त्यांच्या आवडत्या खेळाडूंवर बोली लावतील. प्रत्येकजण आयपीएलचा उत्कृष्ट संघ तयार करण्याचा प्रयत्न करतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *