Video : अमेरिकेत बर्फवृष्टीचा बॉम्ब, ख्रिसमसला ग्रहण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २४ डिसेंबर । चीनमध्ये कोरोनाने (China Corona news) थैमान घातला असतानाच अमेरिकेत कोरोनाच्या (Corona in America) रुग्णांमध्येही वाढ होते आहे. अशातच अमेरिकेवर अजून एक संकट ओढवलं आहे. कडाक्याची थंडी आणि त्यात मुसळधार बर्फवृष्टीने असं दुहेरी संकटामुळे अमेरिकन त्रस्त आहेत. ख्रिसमसच्या उत्सावाला या बर्फवृष्टीने ब्रेक लावला आहे. या महाभयानक बर्फवृष्टीमुळे (heavy snowfall) सामान्यांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शिकागो, डेन्व्हरसह अमेरिकेतील (chicago, America, Denver) अनेक शहरांमध्ये थंडीने कहर केला आहे. अनेक भागात तापमान खाली कोसळलं आहे. अमेरिकेत बर्फवृष्टीमुळे निर्माण झालेले भयान वास्तवाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral social media) होतं आहेत.

बर्फसृष्टीचा फटका
अमेरिकेत प्रचंड बर्फवृष्टी होत असून जवळपास 70 टक्के नागरिकांना याचा फटका बसतोय. जोरदार बर्फवृष्टी, वेगाने वाहणारे थंड वारे यामुळे अनेक भागांमध्ये तापमान सध्या उणे 36 डिग्री सेल्सियसवर गेलंय. ख्रिसमसच्या तोंडावरच तिथल्या लोकांना बर्फवृष्टीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.

प्राण्यांचे हाल
अमेरिकेत जोरदार बर्फवृष्टी सुरूये. आर्क्टिक प्रदेशातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे अर्ध्या अमेरिकेला बर्फाने वेढलंय..त्याचा परिणाम प्राण्यांवरही होतोय..मोंटानामध्ये जनावरं थंडीपासून बचाव करण्यासाठी बर्फातून पळापळ करतायत. जनावरांचे गोठे, गवत पूर्णपणे बर्फाने झाकली गेलीयत.

रस्ते आणि विमान वाहतुकीवर परिणाम
मीडिया रिपोर्टनुसार या बर्फवृष्टीमुळे रस्ते आणि विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. आतापर्यंत 2,270 हून अधिक यूएस फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाय 7,400 हून अधिक उड्डाणे उशिरा झाले.

अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेने रविवारपर्यंत देशात 4 फूट बर्फ पडण्याची शक्यता वर्तवली आहे. जोरदार हिमवृष्टीच्या संभाव्य धोक्यामुळे पश्चिम न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.  दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या इशारामुळे लोकांना घरामध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *