प्रस्तावित पिंपरी ते निगडी मेट्रो प्रकल्प रद्द करा ; सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २४ डिसेंबर । पिंपरी चिंचवड । जुना पुणे-मुंबई महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी निगडीतील भूमिपूत्रांच्या जागा संपादित केल्या आहेत. त्याचा अतिशय कमी मोबादला भूमीपूत्रांना देण्यात आला आहे. प्रस्तावित पिंपरी ते निगडी मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरू करण्यासाठी 50 मीटर रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपूत्र बेघर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मेट्रो मार्ग रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी राज्य शासनाकडे केली आहे

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहे. त्यात काळभोर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पिंपरी ते निगडी मेट्रो रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात यावा. या रस्त्याचे तीन वेळा रुंदीकरण करण्यात आले. निगडी येथील भूमिपूत्रांच्या जागा रस्ता रुंदीकरणामध्ये संपादित करण्यात आल्या आहेत. आता पुन्हा पिंपरी ते निगडी मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरू होणार आहे. त्यासाठी 50 मीटर रस्ता रुंदीकरण करण्यात येणार असून त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचे निगडीपर्यंत 1986 ते 2003 दरम्यान तीन वेळा रुंदीकरण करण्यात आले होते. त्या संदर्भात कमी किंमतीचा मोबदला स्थानिक भूमिपूत्रांना देण्यात आला होता. पुन्हा रस्ता रुंदीकरण करण्यात येणार असून स्थानिक भूमिपुत्र बेघर होण्याची दाट शक्यता आहे. (Metro) त्यामुळे पिंपरी ते निगडी मेट्रो रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात यावा.
स्थानिक भूमिपूत्रांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी मिळावी.

…तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा
तसेच जमीन भूखंडाची पाच पटीने रक्कम देण्यात यावी. यापूर्वी रस्ता रुंदीकरण करण्यात आले. त्यावेळी स्थानिक भूमिपूत्र, व्यापारी वर्गाला महापालिका प्रशासन गाळे, जागा देण्यात येणार होते. ती फाईल भुमी जिंदगी विभाग यांनी मंजूर करून सध्या मंत्रालयात धूळ खात पडून आहे. (Metro) त्या संदर्भात निर्णय घ्यावा. निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा खर्च अकरा हजार चारशे पंचवीस कोटी रुपये मंजूर करण्यात आला. दहा पटीने वाढीव खर्च मंजूर करण्यात आला आहे. पिंपरी ते निगडी मेट्रो रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात यावा,अशी विनंती काळभोर यांनी केली आहे. प्रकल्प रद्द केला नाही. तर, जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *