महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २४ डिसेंबर । राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असलं तरी दुसरीकडे हवामानात मात्र गारवा पसरला आहे. नाशिकच्या निफाडमध्ये नुकतीच आलेली आकडेवारी पहिली तर कुंडेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 7.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढू लागल्याने शेकोट्या पेटू लागल्या आहे. गुलाबी थंडी पासून बचाव करण्यासाठी ऊबदार कपडे आणि शेकोट्या पेटू लागल्या आहे. याचा फटका काही शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता असली तरी दुसरीकडे काही शेतकऱ्यांना या थंडीचा फायदा होणार आहे. गहू, हरभरा, कांदे यांच्यासारख्या पिकांना थंडी फायदेशीर असते पण द्राक्ष बागेला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून राज्यातून येणाऱ्या वाऱ्याचा प्रवाह वाढला की उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा घसरत असतो. अशातच जिल्ह्यात गोदावरी नदी, झाडे आणि हिरवीगार शेती असल्याने देखील किमान तापमानात मोठी घट निर्माण होत असते.
नाशिक जिल्ह्यासह राज्यात थंडीचे जोरदार पुनरागमन झाले असून नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील किमान तापमानाचा पारा घसरला आहे.नाशिक जिल्ह्यात कुंदेवाडी येथे 7.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असून येत्या काळात हा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामातील किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची ही चौथी वेळ आहे, त्यामुळे येत्या काळात पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगमातील थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहे, नागरिक ऊबदार कपडे घालूनच बाहेर पडत आहे,