IPL 2023 Auction : आयपीएल मध्ये पहिल्यांदाच दिसणार ‘हा’ धडाकेबाज खेळाडू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २४ डिसेंबर । पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामासाठी आज (23 डिसेंबर) मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) कोचीमधील (Kochi) फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडत आहे. अशातच आयपीएलच्या गेल्या 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक स्टार खेळाडू जगातील सर्वात श्रीमंत T20 क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. (IPL 2023 Auction England batter Joe Root finally bag an contract with the Rajasthan Royals marathi news)

इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटला (Joe Root) पहिल्यांदाच आयपीएलच्या लिलावात विकत घेण्यात आलं आहे. आयपीएलच्या गेल्या 15 वर्षांच्या इतिहासात प्रथमच जो रूटला (Joe Root) आयपीएलमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या लिलावात जो रूटला राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने 1 कोटी रुपयांना विकत घेतलंय. त्यामुळे आता आयपीएलमध्ये देखील जो रूटची जादू पहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *