महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ डिसेंबर । पिंपरी चिंचवड शहराची सुरक्षितता धोक्यात घालून अतिशय वादग्रस्त पार्श्वभूमी असणाऱ्या कंपनीकडे शहरातील इंटरनेट कनेक्शनचे जाळे सोपविण्याचा प्रयत्न सद्या सुरू आहे. परंतु या कंपनीस काम मिळाले तर शहरातील नागरिकांच्या सायबर सिक्युरिटीचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. यासाठी या कंपनीस हे काम मिळू नये यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
या कामामुळे शहरातील नागरिकांचे आर्थिक व्यवहार, गोपनीय गोष्टी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्या सर्व व्यवहार हे ऑनलाईन होत आहेत. तसेच अनेकांचे सर्व महत्वाचे दस्तावेज ऑनलाईन सेव्ह केलेले असतात. अशा सर्व गोष्टींचा विचार करता हे काम जबाबदार कंपनीकडे जाणे महत्त्वाचे आहे.
याकरिता पिंपरी चिंचवडकरांच्या जीवनाशी निगडित अतिशय महत्त्वाच्या या विषयाकडे तातडीने लक्ष घालावे म्हणून महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.