केंद्रशासन डिसेंबर-23 पर्यंत देणार मोफत धान्य; रेशन कार्ड काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया घ्या जाणून

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ डिसेंबर । केंद्रशासन देशातील 80 कोटी नागरिकांना डिसेंबर 2023 पर्यंत मोफत धान्य वाटप करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या योजनेसाठी तुम्हाला मात्र रेशन कार्डाची गरज असणार आहे. जर तुमच्याकडे अद्यापही रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. दुसरे म्हणजे रेशन कार्ड कसे काढायची याची माहिती देखील अनेकांना नसती. चला तर आज जाणून घेऊ की, घरबसल्या तुम्ही रेशन कार्ड कसे काढणार? जाणून घ्या प्रक्रिया.

डिसेंबर- 2023 पर्यंत मिळणार मोफत धान्य योजना

केंद्रसरकार देशभरातील 80 कोटी जनतेला डिसेंबर -2023 पर्यंत मोफत धान्य देणार आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यातंर्गत पुढील एक वर्ष या योजनेला लाभ देण्याची घोषणा केली आहे. परंतू यासाठी रेशन कार्डची आवश्यकता असणार आहे. रेशन कार्ड आपली ओळखीचा एक महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. त्याचबरोबर मोफत धान्य योजनेसाठी ते आवश्यक मानले जाते. त्याचाशिवाय मोफत धान्य योजनेचा किंवा रेशन दुकानातील धान्य घेता येणार नाही.

18 वर्षांखालील मुलांचे नाव कार्डमध्ये समाविष्ट

जर तुमच्याकडे अद्यापही रेशन कार्ड नसेल तर ते तुम्ही त्वरीत काढू शकता. त्यासाठी तुम्हाला काही प्रक्रिया करावी लागणार आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया करून अर्ज करू शकता. रेशन कार्ड बनविणे आता अतिशय सोपे झालेले आहे. यासाठी तुम्हाला शासकीय कार्यालयांची उंबरठे झिजविण्याची देखील गरज नाही. यासंदर्भातील अनेक कामे आता ऑनलाईन पद्धतीने केली जात आहेत. त्यासाठी ऑनलाईन रेशन कार्डसाठी तुम्ही अर्ज करू शकतात. त्याचबरोबर अर्ज केल्यानंतर तुम्ही कार्डाची स्थिती देखील जाणून घेऊ शकता. भारतीय नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती रेशन कार्डसाठी अर्ज करू शकते. 18 वर्षांखालील मुलांचे नाव पालक रेशन कार्डमध्ये समाविष्ट करू शकतात.

असा करू शकता ऑनलाईन अर्ज

रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
महाराष्ट्रातील नागरिक mahafood.gov.in वर जावून अर्ज करू शकतात.
यानंतर Apply online for ration card या पर्यायावर क्लिक करा.
रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्ही ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्राइव्हिंग लायसन्स इत्यादी देऊ शकता.
रेशन कार्डसाठी तुमच्याकडून ५ रुपयांपासून ते ४५ रुपयांपर्यंत शुल्क घेतले जाईल. अर्ज भरल्यानंतर शुक्ल भरून सबमिट करा.
फील्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा अर्ज योग्य असल्याचे आढळल्यास रेशन कार्ड मिळेल.
रेशन कार्ड बनवण्यासाठी या कागदपत्रांची गरज

रेशन कार्ड बनवण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, सरकारद्वारे जारी करण्यात आलेले ओळखपत्र, हेल्थ कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स देवू शकता.
याशिवाय, पॅन कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, उत्पन्नाचा दाखला, पत्त्याचा पुरावा म्हणून वीजेचे बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट अथवा पासबुक, भाडेकरार इत्यादी कागदपत्रांपैकी काही कागदपत्र लागतील.
अर्जाचे स्टेट्स असे तपासू शकता

रेशन कार्डसाठी अर्ज केल्यावर तुम्ही घरबसल्यास अर्जाची स्थिती तपासू शकता. यासाठी डिपार्टमेंट ऑफ फूडच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर Citizen Corner सेक्शनवर क्लिक करा.
आता Track Food Security Application वर क्लिक करा.
यातील चार पर्यायांपैकी एक भरा.
आता तुम्ही अर्जाची स्थिती पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *