महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ डिसेंबर । महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नसल्याचा ठराव कर्नाटक विधानसभेत पास करण्यात आला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभेतही आज कर्नाटकविरोधात ठराव आणण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. (Maharashtra Karnataka Border issue Eknath Shinde big announcement )
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारांचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी सीमावादार आत्तापर्यंत ब्र सुद्धा काढला नाही. अशी टीका ठाकरे यांनी केली.
दरम्यान, सर्व घडामोडीनंतर विधानसभेत कर्नाटकविरोधात ठराव आणण्याची घोषणा शिंदे यांनी केली आहे. कर्नाटकनं महाराष्ट्राविरोधात केलेल्या ठरावानंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभेतही कर्नाटकविरोधात ठराव आणण्यात येणार आहे.
सीमावादावरून राज्य सरकार मागं हटणार नसल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर आता आज विधानसभेत याबाबतचा ठराव आणण्यात येणार आहे.