महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ डिसेंबर । महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, नागपूर भूखंड घोटाळा आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राज्याचे हिवाळी अधिवेशन गाजत आहे. असे असतानाच शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मंत्री दादा भुसे हे पोलिसांसमोरच दोन व्यक्तींना शिवीगाळ करत मारत असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडीओ ट्विटर वर शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये दादा भुसे यांच्यावर तरुणाला धमकावल्याचा आणि मारल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून करण्यात आला आहे.
मंत्री दादा भूसे फटकावतात .
शिव्या देतात
मुख्यमंत्री साहेब
कुठला गुन्हा पोलिस घेणार
पोलिसां समोर मारले
माझा नग्न फोटो fb वर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत #सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौझ उभी केलीत supreme court मध्ये
रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक
आता बोला .. pic.twitter.com/EGsJmvApfI— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 26, 2022
आधीच भूखंड घोटाळ्याच्या आरोपावरून मुख्यमंत्री, त्यानंतर अब्दुल सत्तार अडचणीत आलेले असताना आता दादा भुसे यांचा व्हिडीओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी अडचणीत आणण्याची शक्यता आहे.
या व्हिडीओत मंत्री भुसे हे समोरील व्यक्तीला शिवीगाळ करत पोलिसांसमोर मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. परंतु हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
व्हिडीओ ट्विट कराताना जितेंद्र आव्हाड म्हणतात की, ‘मंत्री दादा भूसे फटकावतात… शिव्या देतात… मुख्यमंत्री साहेब कुठला गुन्हा पोलिस घेणार… पोलिसांसमोर मारले… माझा नग्न फोटो fb वर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत… #सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौझ उभी केलीत supreme court मध्ये… रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक आता बोला…’