महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ डिसेंबर । नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सटाणा येथील जायखेडा येथील भूमीपुत्र व भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान सारंग अशोक अहिरे यांचा आसाम राज्यात कर्तव्यावर असताना निधन झाले आहे. शेतकरी कुटुंबातील सारंग प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत वयाच्या 19 व्या वर्षी सैन्यदलात भरती झाले होते.
सटाणा (Satana) येथील जायखेडा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सारंग यांनी अतिशय हलाकीच्या परिस्थिती आपले शिक्षण पूर्ण केले. दहावी पर्यंतचे शिक्षण जायखेडा जनता इंग्लिश स्कुल मध्ये घेतले व नंतर बारावीचे शिक्षण ताहाराबाद येथे पूर्ण करून सैन्यदलात भरती झाले आणि पुणे येथे सेवेला प्रारंभ झाला. सारंग हे भारतीय सैन्य दलात 103 इंजिनिअरकडे गेल्या 11 वर्षांपासून कार्यरत होते. सारंगच्या मृत्यूची बातमी सकाळी बागलाण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली, या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली. सारंग अहिरे याचे पार्थिव आज दुपारपर्यंत जायखेडा येथे पोहचण्याचा अंदाज आहे.
दरम्यान जवान अहिरे यांच्या निधनाची बातमी धडकताच बागलाण तालुक्यासह नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. शेतकरी कुटुंबातील सारंग हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत वयाच्या 19 व्या वर्षी सैन्य दलात भरती झाले होते. तीन महिन्यांपूर्वी घरी येऊन गेलेले सारंग हे त्या 5 जानेवारीला सुट्टीवर घरी येणार होते. सैन्यदलात 103 इंजिनियर कमांड मध्ये ते गेल्या अकरा वर्षांपासून कार्यरत होते. रविवार 25 डिसेंबर रोजी रात्री कर्तव्यावर असताना त्यांचे निधन झाल्याचे संबंधित विभागामार्फत करण्यात आले. मात्र मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकले नाही. सारंग अहिरे यांचे पार्थिव बुधवार 28 रोजी जायखेडा येथे पोहोचण्याचा अंदाज असून त्यानंतर त्यांना शासकीय कामात निरोप देण्यात येणार असल्याचे समजते.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील जायखेड्याचे भूमिपुत्र जवान सारंग अशोक अहिरे हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाल्याची बातमी कळली. अतिशय दुःख झाले. शेतकरी कुटुंबातील असलेले शहीद जवान सारंग अहिरे यांनी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण करत भारतीय सैन्यदलात कार्यरत झाले होते. आपल्या भारतमातेच्या सेवेचे कर्तव्य बजावत असताना त्यांना आसाम येथे वीरमरण आले. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, अशाप्रकारे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शोक व्यक्त केला.