महाराष्ट्र 24 – विशेष प्रतिनिधी – दि. 27 – आकुर्डी मधील खंडोबा देवस्थान यात्रेला उद्या पासून सुरवात होणार आहे. त्यानिमित्ताने आकुर्डी मध्ये पाणी समस्या भेडसावी नसल्याने 29 डिसेंबर ते 30 डिसेंबर रोजी दिवसभर पाणी पुरवठा सुरु ठेवण्यात यावा अशी मागणी स्वीकृत नगरसेवक सुनील कदम यांनी केली.
महापालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. सध्या पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी यात्रा उत्सव धूमधडक्यात सुरु आहे. अनेक पै. पाहूणे या यात्रे निमित्ताने आपल्या नातेवाईक यांच्या कडे आले आहेत. त्यामुळे शहरात पाणी समस्या निर्माण होऊ नये म्हूणन ठीक उपाय योजना महापालिका पाणी पुरवठा विभागाने करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. तरी खबरदारी म्हणून यात्रा उत्सव निमित्ताने पाणी पुरवठा खंडित न करता सुरु ठेवावा अशी मागणी स्वीकृत नगरसेवक सुनील कदम यांनी केली आहे
तसेच यात्रे दरम्यान विद्युत पुरवठा अखंडित चालू ठेवावा अशी मागणी विद्युत प्रभाग अधिकारी यांच्याकडे स्वीकृत नगरसेवक सुनील कदम यांनी केली आहे.